Pune : सराईत गुन्हेगार ‘छोट्या’ दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार

एमपीसी न्यूज – सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज पवार (वय 23, धनकवडी,पुणे­) उर्फ छोट्या याला आज शनिवार दि.4 ऑगस्ट 2018 पासून पुढील दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

सुरजवर बलात्कार, लैंगिक शोषण, घातक शस्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे यांनी छोट्याला तडीपार करण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांना कोणत्याही भागात सुरज दिसून आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.