Pune : मार्केटयार्डमधील सराईत पुणे शहरातून एक वर्षासाठी तडीपार

एमपीसी न्यूज – मार्केटयार्डमधील सराईत गुन्हेगाराला आज शनिवारपासून (दि. 8) एका वर्षासाठी पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे. 

रुस्तम रामचंद्र पाखरे (वय 22, रा. मार्केटयार्ड) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुस्तमवर जाळपोळीचे गंभीर गुन्हे करत होता. त्याच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याची मार्केटयार्ड परिसरात दहशत होती. त्यामुळे त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे.

ही कामगिर युनिट दोनचे पोलीस उपआयुक्त बचन सिंग यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.