Sangvi : मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगाराचा खून
एमपीसी न्यूज – मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री औंध परिसरात घडली.
निलेश जीवन खेराळे (वय 36, रा. कामगार वसाहत औंध) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि त्याच्या मित्राची शनिवारी रात्री किरकोळ कारणातून बाचाबाची झाली. यातूनच मित्रांनी त्याच्या डोक्यात फरशी मारली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या निलेशचा मृत्यू झाला. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
निलेश याच्या बायकोने आत्महत्या केली असून त्याप्रकरणी त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तसेच सांगवी परिसरात लंगरवरून झालेल्या भांडणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.