Pune : पोलीस अभिलेखावरील फिरोज बंगाली टोळीतील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

गावठी कट्टा व काडतुसासह 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील फिरोज बंगाली टोळीतील सराईत गुन्हेगार मोहसिन उर्फ डंचो गालिब सैय्यद (वय 28, कोंढवा, पुणे) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे व पोलीस शिपाई कैलास साळूंखे, नितिन रावळ यांच्या पथकाने बुधवारी (दि.31) ही कारवाई केली. 

युनिट तीनचे पोलीस राजकुमार केंद्रे व त्यांच्या पथकाला मोहसिन हा पुण्यातील ओव्हर ब्रिज जनता वसाहत पुणे येथे येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिताफीने मोहसिनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन काडतूस असा एकूण 40 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे.

मोहसिन हा गैंगस्टर खडावसिम याच्या खुनाच्या गुन्ह्यातील महत्वाचा आरोपी असून त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी मोहसिन जामिनावर सुटला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.