Dighi : दहशत माजविणारी सराईत गुन्हेगारांची टोळी तडीपार

एमपीसी न्यूज – दिघी परिसरात दहशत माजविणा-या चार जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. 

अनिकेत हेमराज वाणी (वय 19 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अमर विनायक माने (वय 19, रा. दिघी रोड), निखील रामचंद्र डाबळे (वय 19, रा. सावंतरनगर, दिघी) आणि मंगेश शुक्राचार्य मोरे (वय 19, रा. आळंदी दिघी रोड, भोसरी) अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

आरोपींनी गेल्या दोन वर्षांपासून दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे केले आहेत. दिघी परिसरात त्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपींवरील सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड जमा करुन तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार या चार जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.