Pune : रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – चतुःश्रूंगी पोलीस ठाणे येथील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीस पुणे पोलिसांच्या युनिट चारच्या शाखेकडून जेरबंद करण्यात आले.

विजय शंकर गायकवाड (वय 22, रा. दिनराज मित्र मंडळाजवळ, जनवाडी), असे या तडीपार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट चारचे कर्मचारी पोलीस गणेश काळे यांना त्यांच्या खब-यामार्फत गायकवाड हा निलज्योती बस स्टॉप येथे आल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सापळा रचून गायकवाड याला पकडण्यात आले. त्याच्यावर मपोअ 2019 कलम 142 याप्रमाणे कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.