Pune News : बंद पडलेल्या ई टाॅयलेटचा ’ खर्च भाजपच्या नगरसेवकांच्या मानधनातून वसुल करा

एमपीसी न्यूज :  शहरात खासदार निधी खर्च करून बसविण्यात अलेले सर्वच ‘ई टाॅयलेट’ बंद पडले  आहे . ई टाॅयलेट’ ही याेजना फसवी आणि अव्यवहार्य आहे. यासाठी झालेला खर्च हा खासदार, आमदार आणि  ज्या नगरसेवकांच्या प्रभागात बसविली गेली आहे, त्या भाजपच्या नगरसेवकांच्या मानधनातून वसुल करावी, संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष  वसंत माेरे यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आल्याचे माेरे यांनी नमूद केले. 

तत्कालीन खासदार अनिल शिराेळे यांच्या खासदार निधीतून शहरातील अकरा ठिकाणी  पंधरा अत्याधुनिक अािण स्वंयचलित ‘ई टाॅयलेट’ बसविली गेली हाेती. यापैकी नऊ ‘ई टाॅयलेट’ शिराेळे यांचे चिरंजीव , नगरसेवक  आणि  सिद्धार्थ शिराेळे हेे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये बसविले गेले.

उर्वरीत ‘ई टाॅयलेट’ शहराच्या इतर भागातील भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात बसविले गेली  आहेत. महापािलकेने माहीती अधिकारात या पंधरा पैकी बारा ‘ई टाॅयलेट’ चालू असल्याची माहीती दिली . परंतु, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर एकही ‘ई टाॅयलेट’ सुरु नसल्याचे निदर्शनास अाल्याचे माेरे यांनी नमूद केले.

२०१४ ते २०१९ या कालावधीत बसविलेल्या या ‘ई टाॅयलेट’ची पहील्या वर्षीची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनी एक वर्ष माेफत करणार हाेती. परंतु, यातील अनेक ‘ई टाॅयलेट’ ही सुरुच झाली नाही, त्याचा वापर देखील झाला नाही.एक वर्षाच्या मुदतीनंतर प्रत्येक  ‘ई टाॅयलेट’च्या देखभालीसाठी  आठ  हजार ते अकरा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित  आहे .

यासाठी महापािलकेला महीना दिड लाख रुपये इतके पैसे माेजावे लागणार आहेत.  माध्यमातून महापािलकेला २६ महीन्यात केवळ ४३ हजार रुपये इतकेच उत्पन्न मिळाले. पण संबंधित कंपनीने देखभालीचा खर्च महापािलकेकडे मागितला, करार करण्याचा प्रस्ताव दिला  हाेता. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवला गेला हाेता. परंतु, याविषयात मनसेने लक्ष घातल्यानंतर ही प्रक्रीया थंाबली असल्याचा दावाही माेरे यांनी केला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.