Pune News: अग्निवीर जनरल ड्युटीच्या निवडीसाठी पुण्यात 6 डिसेंबर रोजी भरती मेळावा

एमपीसी न्यूज : अग्निवीर जनरल ड्युटी (महिला मिलिटरी पोलीस) च्या निवडीसाठी पुण्यातील भरती मेळावा 06 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत बीईजी आणि सेंटर, खडकी येथे आयोजित केला आहे.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण येथील तरुणींना भारतीय सैन्यात दाखल होण्याची संधी देणे आणि त्यांना देशसेवा करण्याची तसेच सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देणे, हे या भरती मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Pune News : विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकास महत्त्वाचा: डाॅ. अनिता पाटील यांचे मत

पुढील 3 ते 4 दिवसांत संभाव्य उमेदवारांची तपासणी केली जाईल. उमेदवारांची निवड शारीरिक, वैद्यकीय आणि सामाईक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा) अशा तीन टप्प्यांत होईल. जे उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत त्यांनाच लेखी चाचणी दिली जाईल.

उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेवर आधारित असेल आणि त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात लष्करी पोलिस दलात अग्निवीर म्हणून सामील होण्यासाठी बोलावले जाईल.

रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाने खूप सहकार्य करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.