Pimpri news: महापालिकेत मानधनावर 50 वैद्यकीय अधिका-यांची भरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महापालिकेतर्फे कोविड केअर सेंटर चालू केले आहेत. त्यासाठी महापालिकेचे डॉक्टर कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने  मुलखातीद्वारे 50  वैद्यकीय अधिका-यांची मानधनावर भरती केली आहे. दोन महिन्यांसाठी त्यांना घेण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आणखी 25 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. दिवसाला साडेतीन हजारांपर्यंत नवीन रुग्ण आढळत आहेत. महापालिका रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महापालिकेकडून कोविड केअर सेंटर, जम्बो रुग्णालय सुरू केले आहे. महापालिकेचे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे महापालिकेने मुलखातीद्वारे 50  वैद्यकीय अधिका-यांची मानधनावर भरती केली आहे.

वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. शैक्षणिक पात्रता  मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ य इंडीयन मेडिसीन यांचेकडील नोंदणी बंधनकारक. इंटर्नशीप  झाल्यानंतर 1 वर्षेकामाचा अनुभव असलेल्या डॉक्टरांची भरती केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस.

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस. पदवी उत्तीर्ण, सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र बंधनकारक  संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोबीड 19 आयुष नोंदणी असलेल्या डॉक्टरांना मानधनावर घेतले आहे.

वैद्यकीय अधिकारी कोविड 19 आयुश प्रमाणपत्रधारक
शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील बी.ए.एम.एस./बी.यु.एम.एस.
पदवी उत्तीर्ण, सबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र आणि संबधित महाराष्ट्र कौन्सिल कडील कोवीड 19 आयुष नोंदणी असलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून घेतले आहे.

वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेच्या डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. त्यासाठी मुलखातीद्वारे 50  वैद्यकीय अधिका-यांची मानधनावर भरती केली आहे. दोन महिन्यांसाठी त्यांना घेण्यात आले आहे. जशी आवश्यकता भासेल तसे आणखी 25 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.