Pune News : रेडझोनबाबत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज : रेडझोनबाबत अहवाल सादर करा (Pune News) असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, भूमी अभिलेख पुणे व डिफेन्स इस्टेट ऑफिसर पुणे यांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रेडझोन हद्दीबाबत सर्व्हे क्रमांक आणि प्लॉट क्रमांकानुसार नकाशे आणि रेडझोनची हद्द नव्याने प्रसिध्द करण्याच्या शिवसेनेच्या मागणीची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे. त्यानुसार रेडझोन संदर्भात आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, पुणे, डिफेन्स इस्टेट ऑफिसर, पुणे यांना जिल्हाधिकारी कार्यालय पुण्याकडून पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांनी याबाबतचे पत्र पाठवले आहे.

शिवसेना यमुनागर विभागप्रमुख सतीश मरळ यांच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड हद्दीतील काही भागात असलेल्या रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश नुकतेच विभागीय आयुक्तांना दिले होते.(Nigdi News) या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, पुणे, डिफेन्स इस्टेट ऑफिसर, पुणे यांच्याकडून स्वयं स्पष्ट अभिप्रायासह अहवाल मागविण्यात आला आहे.

Lumpy Decease : राज्यात लम्पीमुळे 28 हजार जनावरांचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड हद्दीतील काही भागात असलेल्या रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लेखी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. त्यात निगडीतील सर्वे नंबर 56,57 व 63 हे रेड झोनमध्ये येत असताना या सर्व्हे नंबर मधील शरदनगरमध्ये एसआरए प्रकल्प सुरू झाला आहे.

याला जिल्हाधिकारी पुणे यांनी हे क्षेत्र रेड झोनमध्ये येत नाही असे पत्र दिले आहे. त्यामुळे कोणते क्षेत्र रेड झोन मध्ये व कोणते क्षेत्र बाहेर आहे याबाबत स्पष्टता करावी.(Pune News) शरदनगरमधील रेड झोनमध्ये रेनबो डेव्हलपर यांना परवानगी कशी दिली गेली याबाबत ही चौकशी व्हावी तसेच पिंपरी चिंचवड भागातील यमुनानगर, त्रिवेणीनर, चिखलीतील मोरे वस्ती, साने चौक हे रेड झोन क्षेत्रामध्ये येते का ? याबाबत स्पष्टता करण्याचे निर्देश दिले होते.

 

 

रेडझोनबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील रेडझोनबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र रेडझोन मध्ये येते याची कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना त्यांची घरे विक्री करता येत नाहीत, मालमत्तावर कर्ज घेता येत नाही. जमीन विकसीत करता येत नाही तसेच जुन्या बांधकामांचा पुनर्विकास ही करता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. याविषयी सतीश मरळ यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांना निवेदन देऊन यामध्ये विशेष लक्ष घालण्याची विनंती केली होती.

 

अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, भूमी अभिलेख, डिफेन्स इस्टेट आणि नगर भूमापन कार्यालयाला रेडझोनशी संबंधित स्वयंस्पष्ट अभिप्राय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.