Lifestyle : युनिक फीचर्स असलेला नवा रेडमी के 30

मोबाइलच्या दुनियेमध्ये शाऊमी कंपनीचा नवा रेडमी के 30 हा नवा फोन लवकरच बाजारात येणार आहे. युनिक फीचर्स असलेला हा फोन पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. पण तत्पूर्वी हा फोन तुम्हाला शाउमीच्या वेबसाइटवर ऑनलाईन प्री-ऑर्डर करता येऊ शकणार आहे. काय आहेत या मोबाइलचे युनिक फीचर्स जाणून घेऊ या

तुमचे बजेट 25 हजार रुपयांचे असेल तर रेडमी के 30 हा तुमच्यासाठी एकदम फिट आहे. 6.39 इंच आकाराच्या मोबाइलमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी रॉम, 4500mAh बॅटरी असून पाच मिनिट चार्ज करून तुम्ही 3 तास या फोनवर मनसोक्त बोलू शकता. फ्रंट कॅमेरा 24 मेगा पिक्सेल आणि रिअर कॅमेरा 48 मेगा पिक्सेल + 16 मेगा पिक्सेल + 8 मेगा पिक्सेल असा ट्रिपल प्रायमरी कॅमेरा आहे. शिवाय एलईडी फ्लॅश, फिंगर प्रिंट लॉक, ऑटो फोकस अशी अन्य वैशिष्ट्ये असलेला फोन 31 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन खरेदी करू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.