Mumbai News : देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात

ठाकरे सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज : राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत देखील कपात करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे.  दुकरीकडे सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारनं घेतलेला हा निर्णय सुडाच्या भावनेतून घेतला असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.