Pune News : लग्नाचे आमिषाने शरीरसंबंध, प्रेग्नंट राहिल्यानंतर लग्नास नकार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एका 26 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले ती  प्रेग्नेंट राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणा विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2016 पासून वारंवार हा प्रकार घडला आहे. 26 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी आणि फिर्यादी तरूणीची ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याने नकळत शारीरिक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ काढले होते.
_MPC_DIR_MPU_II
त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणी दोन वेळा प्रेग्नेंट राहिली होती. त्यानंतर आरोपीने तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.