Pimpri: शहरात 1 हजार 77 नवीन रुग्णांची नोंद; 316 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

Registration of 1,077 new patients in the city; 316 discharged, 11 dead : शहरातील रुग्णसंख्या 19 हजार 431 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1034 आणि शहराबाहेरील 43 अशा 1077 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 316 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 19  हजार पार झाली असून 19 हजार 431 वर पोहोचली आहे.

आज 11  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भोसरीतील 52 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 80 वर्षीय वृद्ध,  दापोडीतील 27, 32 वर्षाचे दोन युवक,  चिंचवडगावातील 86 वर्षीय पुरुष, दिघीतील 40 वर्षाची महिला, खराळवाडीतील 68 वर्षीय पुरुष,   निगडीतील 65 वर्षीय महिला,  चाकण मधील 43 वर्षीय महिला,पाषाण येथील 65 वर्षीय आणि  शिरुर येथील 79 वर्षीय वृद्धचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 19 हजार 431 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 12278 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील  311 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 82 अशा 393 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या  3142 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 5172

# पॉझिटीव्ह रुग्ण -1077

#निगेटीव्ह रुग्ण – 3999

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1399

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3142

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 4956

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -19,431

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3142

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -393

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -12278

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24653

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 84531

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.