Corona Vaccine : ‘कोविड19’ वरील पहिल्या लसीची रशियात नोंदणी 

Registration of the first vaccine on ‘Covid 19’ in Russia.

एमपीसी न्यूज – रशियात ‘कोविड -19’ वरील प्रभावी असणाऱ्या पहिल्या लशीची नोंद करण्यात आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. गॅमलेया संशोधन संस्था आणि रशियन संरक्षण मंत्रालय यांनी संयुक्तपणे ही लस विकसित केली आहे.

‘एएफपी’ या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कोविड -19’  वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे, असे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी (दि.11) एका सरकारी बैठकीत जाहीर केले. पुतीन यांच्या कन्येनेही ही लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वी रशियाने याबाबत माहिती देत 12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार रशियाने या लसीची घोषणा केली असून ही सल लवकरच बाजारात येणार असल्याचे म्हंटले आहे.

मात्र, मॉस्कोच्या गॅमलेया इन्स्टिट्यूट आणि देशाच्या संरक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने विकसित केलेली ‘गॅम-कोविड-व्हॅक लियो’लस, क्लिनिकल चाचण्या पूर्ण होण्यापूर्वीच नागरिकांच्या वापरासाठी मंजूर झाल्यामुळे, त्याची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या आठवड्यात, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाला लसीसाठी करत असलेल्या घाई बद्दल सावध केले होते. अमेरिकेचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ अँथनी फॉकी यांनी अमेरिकेच्या खासदार  समितीसमोर चीन आणि रशियामध्ये निर्माण होणार्‍या लसी बद्दल शंका व्यक्त केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.