Crime News : पोलिसात तक्रार दिल्यामुळे नातेवाईकांनी पती-पत्नीसह सुनांना केली शिवीगाळ व मारहाण

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्यामुळे नातेवाईकांनी घरात घुसून पती-पत्नीस व त्यांच्या दोन्ही सुनांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना माण गावामध्ये मंगळवारी (दि.16) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली.याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष मोहिते, किशोर मोहिते, अंकुश मोहिते व त्यांचे अनोळखी 3 ते 4 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी व आरोपी ही एकमेकांचे नातेवाईक आहेत व यापूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोघांचे एकमेकांच्या विरोधात अर्ज दिले आहेत.फिर्यादी त्यांच्या राहत्या घरी असताना यातील सर्व आरोपी त्यांच्यासोबत त्यांचे बॉडीगार्ड सह आपसात संगनमत करून घरात घुसले.फिर्यादीच्या पतीला ढकलून दिले व हाताने मारहाण केली. फिर्यादी ह्या पतीला सोडविण्यासाठी गेल्या असता संतोष मोहिते याने त्यांचा हात धरून, शिवीगाळ केली, साडी ओढून ब्लॉऊजची बाही फाडली.

Amol Awate: पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा रविवारी सत्कार

फिर्यादीच्या सुनेलाही हाताने कानाखाली मारून, शिवीगाळ केली व घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले.तसेच फिर्यादी व त्यांच्या दोन्ही सुनांच्या असे एकूण तिघींच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.