Maharashtra Monsoon : चाकण परिसराला दमदार पावसाचा दिलासा

सखल भागात तुंबले पाणी

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात बुधवारी (दि.२२) रात्री पासून पावसाने (Maharashtra Monsoon) हजेरी लावली आहे. अधून मधून पावसाच्या मध्यम ते दमदार सरी पडत आहेत. चाकण लगतच्या भागात पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांनी गती घेतली आहे . रात्री पासून बरसलेल्या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसाचे स्वागत केले आहे.

मागील तीन आठवडे लपंडाव खेळलेल्या पावसाने (Maharashtra Monsoon) आता चाकण ( ता. खेड) परिसरात सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. पावसाअभावी सर्वत्र मरगळ आल्याचे वातावरण होते. परंतु, पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरण्यांनी वेग घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच आलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी बांधव आणि नागरिक सुखावले आहेत. वीज वितरणचा नेहमी प्रमाणे बोजवारा उडाला असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरु होता.

Cremation Ceremony : अंत्यविधीसाठी आता लाकडांऐवजी ‘ब्रिकेटस’चा वापर होणार, वृक्षतोडीस आळा बसणार

दरम्यान पाऊस सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरातील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, उड्डाणपुलांच्या लगतचा परिसर आणि शहरातील इतर सखल भागातही पाणी तुंबले आहे. त्यामुळे या भागातुन मार्गक्रमण करताना पादचारी आणि दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याला जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला साचून रस्त्यावर नद्या अवतरल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.