-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan News : भामचंद्र डोंगरावर एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रम

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असलेल्या तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे आषाढी एकादशी निमित्ताने डोंगरावरील विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्यात आली. पायथ्याशी असलेल्या मारुती मंदिरात भजन करण्यात आले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

काही भजनी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या गजरात भामचंद्र डोंगर प्रदक्षिणा मारली. पंचक्रोशीतील भाविक दिवसभर दर्शनासाठी येत होते. भामचंद्र डोंगर पायथ्याशी येणाऱ्या भाविकांना खिचडी,केळी,चहा वाटप भामचंद्र डोंगर सप्ताह समितीच्या माध्यमातून करण्यात आले.

 विकास कामांचा शुभारंभ
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी असलेल्या तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर पायथ्याशी येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना,पाणपोई आणि सुलभ सौचालयाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, सरपंच मीरा दहातोंडे, उपसरपंच विक्रम पाचपुते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी वासुली ग्रामपंचायत सदस्य, भामचंद्र डोंगर सप्ताह समितीचे सदस्य, विविध गावचे सरपंच आणि भाविक भक्त उपस्थित होते.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.