Pune Crime News : पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले, पतीसह सासू-सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या तरुणीसोबत लग्नात करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यासह कुटुंबाच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात. एका विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

 

पती विशाल खोपडे, सासरे अशोक खोपडे, सासू रोहिणी खोपडे त्यांच्यासह दीर आणि इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2014 मध्ये फिर्यादी महिलेचे विशाल खोपडे याच्यासोबत लग्न झाले होते. फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात सर्व मानपान करूनही सासरच्या वाढीव मागणीनुसार सोन्याचे दागिने व पैसे दिले. त्यानंतर ही पती आणि इतर आरोपींनी या महिलेकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. घटस्फोट न दिल्याने फिर्यादी महिलेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून तिला क्रूर वागणूक दिली. तसेच फिर्यादी महिलेचे स्त्रीधन परत न देता आरोपी विशाल खोपडे याने दुसरा विवाह केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.