Remdesivir Price Reduced : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत कपात ; ‘असे’ आहेत नवे दर

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. औषध विभागाच्या वतीने काढलेल्या नवीन दर पत्रकात काही ब्रॅण्डच्या नवीन किंमती दिल्या आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शन किफायतशीर दरात उपलब्धता व्हावी यासाठी केंद्र सरकारने या इंजेक्शनच्या दरात कपात केली आहे.

* असे आहेत नवीन दर

1) कॅडिला हेल्थकेअरचे ‘रेमडॅक’

(सुरवातीचा दर 2,800 रुपये, नवीन दर 899 रुपये)

2) सिन्जिन इंटरनॅशनलचे ‘रेमविन’

(सुरवातीचा दर 3,950 रुपये, नवीन दर 2,450 रुपये)

3) डॉ. रेड्डी लॅबोरेटरीचे ‘रेडिएक्स’

(सुरवातीचा दर 5,400 रुपये, नवीन दर 2,700 रुपये)

4) सिप्ला कंपनीचे ‘सीप्रेमी’

_MPC_DIR_MPU_II

(सुरवातीचा दर 4,000 रुपये, नवीन दर 3,000 रुपये)

5) मायलान फार्मास्युटिकल कंपनीचे ‘डेसरेम’

(सुरवातीचा दर 4,800 रुपये, नवीन दर 3,400 रुपये)

6) ज्युबिलन्ट जेनेरिक्स कंपनीचे ‘ज्युबी-आर’

(सुरवातीचा दर 4,700 रुपये, नवीन दर 3,400 रुपये)

7) हेटेरो हेल्थकेअरचे ‘कोव्हीफॉर’

(सुरवातीचा दर 5,400 रुपये, नवीन दर 3,490 रुपये)

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागणी वाढली असून मोठा तुटवडा भासत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.