Remdesivir Production: रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी 25 नवीन उत्पादन केंद्रांना मंजुरी

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनासाठी 12 एप्रिलपासून 25 नवीन उत्पादन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे रेडमिसिवीरचे उत्पादन दरमहा 40 लाखांवरून 90 लाख होणार आहे. त्यामुळे प्रतिदिन 3 लाख इंजेक्शनची निर्मिती शक्य होणार असल्याचे केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले.

नव्या उत्पादन केंद्रांमुळे उत्पादन क्षमतेत आता दरमहा 90 लाख कुप्यांपर्यंत वाढ झाली आहे, पूर्वी दर महिन्याला 40 लाख कुप्यांचे उत्पादन होत होते. लवकरच दिवसाला 3 लाख कुप्यांचे उत्पादन होईल. या कामावर दररोज देखरेख केली जात आहे. रेमडेसीवरचा पुरवठा करण्यात आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही,’ असे मंडावीया म्हणाले.

दरम्यान, मागील तीन आठवड्यांपासून देशातील अनेक राज्यांत रेमडेसीवरचा तुटवडा निर्माण झाला आहे. काळ्या बाजारात या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात असून अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. केंद्र सरकारने रेमडेसीवरच्या विक्री किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून इंजेक्शनची कमाल व किमान किंमत ठरवली आहे. त्यानुसार हे इंजेक्शन 800 ते 3800 या किंमतीत विकले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.