Pune News : रविवारनंतर रेमडीसीवरचा काळा बाजार केला तर याद राखा : मनसे

, हॉस्पिटल, मेडिकलवाल्यांना मनसेचा इशारा 

एमपीसी न्यूज : रविवारचा लॉकडाऊन संपल्यावर जर पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेड असतानाही रुग्णांना बेड देत नसेल,  कुणी मेडिकलवाला जर रेमडीसीवरचा काळाबाजार करत असेल तर तो १००% फुटणार, असे म्हणत मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील हॉस्पिटल, मेडिकलवाल्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने सापडत आहेत. त्याप्रमाणात रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना देखील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. रेमडीसीवर इंजेक्शनसाठी तर रुग्णाच्या नातेवाईकांना तासनतास मेडिकल बाहेर ताटकळत उभे रहावे लागत आहे. तरीसुद्धा हे इंजेक्शन मिळत नाही..त्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी रुग्णालय आणि मेडिकलवाल्यांना हा इशारा दिला आहे.

आपल्या ट्विटमध्ये वसंत मोरे म्हणतात, रविवारचा लॉकडाऊन संपल्यावर जर माझ्या पुण्यात कोणी हॉस्पिटलमध्ये बेड असतानाही बेड देत नसेल, रेमडीसीवरचा जर कुणी मेडिकलवाला काळाबाजार करत असेल तर तो १००% फुटणार.

ही धमकी नाही, कारण जे सत्तेत बसलेत, अगदी राज्याच्या आणि पुणे महापालिकेच्या, दोघांचाही खेळ तुम्ही बघताय. मी आणि माझा मनसैनिक नाही पाहू शकणार. वेळ आलीच तर कायदाही हातात घेणार, माझं पुणे शहर आता अजून जळताना आम्ही पाहू शकत नाही, कारण आम्ही शिवरायांची औलाद आहोत. अल्टीमेटम टाइम चालू. सावध रहा आम्ही येतोय.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.