Pune : ‘Remembering Gandhi – गांधींना आठवूया…’ कार्यक्रमांतर्गत रविवारी सायकल फेरी

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती नुकतीच देशभरात साजरी केली गेली. या निमित्ताने पुणे शहरात सुधा अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. पुणे शहरात गांधीजींच्या आठवणीचा अपार ठेवा आहे. १८९६ मध्ये ज्यावेळी महात्मा गांधी भारतात आले त्यावेळी त्यांनी अनेक वेळा पुण्याला भेटी दिल्या आणि त्या भेटींना एक वेगळेच ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे आता गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यात रविवारी गांधीजींनी भेटी दिलेल्या जागांना सायकल फेरी काढून गांधींच्या विचारांची आठवण करण्यात येणार आहे. ‘Remembering Gandhi – गांधींना आठवूया…’ या कार्यक्रमाअंतर्गत ही सायकल फेरी काढण्यात येणार आहे. 

–  गोखले इन्स्टिट्यूट : महात्मा गांधी आणि गोखले यांची भेट झाली ते ठिकाण त्याचबरोबर जस्टीस रानडे यांची भेट झालेले ठिकाण
– कॉंग्रेस भवन
– केसरी वाडा : लोकमान्य टिळक आणि गांधीजींची भेट
– विश्रामबाग वाडा
– येरवडा जेल
– आगाखान पॅलेस : महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना नजर कैदेत ठेवलेले ठिकाण
– ससून हॉस्पिटल : याठिकाणी गांधीजी काही दिवस अॅडमिट होते.

अशा अनेक ठिकाणी सायकल फेरी काढून महात्मा गांधींना अनोखे अभिवादन देण्यात येणार आहे. या उपक्रमात साधारणपणे १०० सायकल स्वार सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.