Pimpri news: ‘एचए’ला लस निर्मितीची परवानगी मिळाल्यास महापालिका निधी देण्यास तयार : महेश लांडगे

एमपीसी न्यूज – हिंदूस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीला कोरोना प्रतिबंध लसनिर्मितीसाठी परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारकडून या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार केला जात आहे.हिंदूस्थान अॅँवटिबायोटिक्स (एचए) या आजारी उद्योगात लस बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक मदत देण्यास तयार आहे, अशी माहिती पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी दिली.

आमदार लांडगे म्हणाले की, एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. आरोग्य मंत्रालय या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार करत आहे.

हिंदूस्थान अॅँवटिबायोटिक्स (एचए) या आजारी उद्योगात लस बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक मदत देण्यास तयार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावेळी उद्योगनगरीमध्ये असलेल्या एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली तर तुटवडा कमी होण्यास मदत होईल.

महापालिका हिंदूस्थान अॅँवटिबायोटिक्सला आर्थिक मदत देण्यास तयार आहोत. मात्र, त्यासाठी करार करण्यास सांगितले आहे. येथे तयार होणारी कोरोना प्रतिबंधक लस पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची अट घालणे आवश्यक आहे.

येथील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यावरच कंपनीने दुस-यांना लस द्यावी.पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही एचएला मदतीस महापालिका तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात हिंदूस्थान अॅँोटिबायोटिक्सने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्याची परवानगी मागितली आहे. हा प्रश्न आपण  केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत नेला आहे, असे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

जून-जुलैपर्यंत येथे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसही बनू शकते.हिंदूस्थान अॅँनटिबायोटिक्सला लस निर्मितीची परवानगी मिळण्याबाबत कंपनीतील अधिकारीही उत्साहित आहे. त्यामुळे आजारी पडलेल्या या कंपनीला नवजीवन मिळणार आहे.

सध्या आम्ही कोरड्या पावडरच्या स्वरुपातील औषध बनवितो. लस बनविण्यासाठी आम्हाला वेट पॉवर इंजेक्टेबल बनवावे लागते. प्राथमिक परवनागी मिळाल्यावरआम्ही त्यासाठी आवश्यक मशीनरींमध्ये बदल करू शकतो, असे एचएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.