मंगळवार, जानेवारी 31, 2023

Alandi News : केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा – अॅड. तापकीर

एमपीसी न्यूज : केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांची केंद्रीयमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड विष्णू तापकीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे केली आहे.

महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अॅड तापकीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे इमेल द्वारे तात्काळ राजीनामा घेऊन केंद्रीय मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Nigdi News : निगडी येथे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर

भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराज यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या बदल तसेच अवमान केल्या बद्दल पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड विष्णू तापकीर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे इतर नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सतत अवमानकारक शब्द बोलतात. तसेच सत्तेचा गैरवापर करतात. हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव आहे.

अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे बद्दल महाराष्ट्रातील व केंद्रातील भाजपचे नेते मंडळी त्यांना पाठीशी घालत असून त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यासाठी कोणताही विरोध करून पाऊले उचलीत नाहीत. काहीही बोलत नसून गप्प का आहेत. या मागचे गौड बंगाल काय आहे, असा सवाल अॅड तापकीर यांनी केला आहे.

Latest news
Related news