Pimpri News : ‘रीनैसंस स्टेट’ ; गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शुक्रवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिखाण करणा-या गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (दि.25) डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

गिरीश कुबेर यांनी ‘रीनैसंस स्टेट – द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे.

त्यामुळे गिरीश कुबेर यांच्यावर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या अर्जात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.