Renault Trieber : नव्या, अद्ययावत वैशिष्ट्यांसह रेनो इंडियाची ‘माय 21 ट्रायबर’ भारतात दाखल

एमपीसी न्यूज : रेनो इंडियाने 5.30 लाख रुपयांच्या आकर्षक आणि अतुलनीय किंमतीत नवी रेनो ‘ट्रायबर माय 21’ बाजारात दाखल केली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये रेनो ‘ट्रायबर’ ही अतिशय प्रशस्त आणि अल्ट्रा-मॉड्यूलर वाहन बाजारात आणले, भारतात 75 हजार समाधानी ग्राहक निर्माण झाल्याने रेनोसाठी हे अत्यंत क्रांतिकारी उत्पादन ठरले आहे.

भारतीय बाजारातील नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या संधी लक्षात ठेवूनच रेनो ट्रायबर डिझाईन करण्यात आली. ज्यांना चार मीटरपेक्षा लहान कार हवी आहे त्यांच्यासाठी रेनो ट्रायबर फायदेशीर ठरु शकते. गेल्या वर्षी इझी-आर एएमटीच्या पर्यायानंतर लवचिक, आकर्षक आणि किफायतशीर किमतीमुळे ट्रायबरच्या युएसपीमध्ये वाढ झाली आहे.

अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणारी संपूर्ण नवी ट्रायबर माय 21 हे जास्त मूल्य आणि अतिशय लवचिक, जास्त आकर्षक आणि तरीही किफायतशीर आहे. नाविन्यपूर्णता आणि आधुनिकतेच्या दृष्टीने एक क्रांतिकारी उत्पादन ठरले आहे. प्रवाशांसाठी अधिक आराम देऊ करणाऱ्या रेनो ट्रायबरमध्ये आता स्टीअरिंग व्हीलवर ऑडियो आणि फोन कंट्रोल्स आणि उंची बदलता येणारी ड्रायव्हर सीट यात देण्यात आल्याने कारच्या लवचिकतेमध्ये वाढ झाली आहे.

संपूर्ण नव्या ट्रायबरमधील सर्व रंग पर्यायांमध्ये ड्युअल टोन बाह्यांग, कारचा नवा सीडर ब्राऊन रंग आणि ओआरव्हीएमवरील एलईडी टर्न इंडिकेटर यामुळे कारच्या आकर्षकतेमध्ये भर पडली आहे. व्यावहारिकता आणि किफायतशीरपणा या दृष्टीने रेनो ट्रायबर ही ह्या विभागातील सर्वात किफायतशीर एएमटी असून तिचा देखभाल खर्च हा अतिशय कमी झाला आहे.

आकर्षक रचना, मजबूती आणि बहुआयामी वाहन असणाऱ्या रेनो ट्रायबरमध्ये चार मीटरपेक्षा कमी जागेत एक ते सात जण अतिशय आरामशीरपणे सामावू शकतात. भारतातील ग्राहकांच्या अपेक्षांचा संपूर्ण अभ्यास करूनच रेनो ट्रायबरची निर्मिती करण्यात आली असल्याने ती अतुलनीय लवचिकता देऊ करते. प्रत्येक ओळीत रेनो ट्रायबरमध्ये बसण्यासाठी भरपूर जागा देण्यात आली आहे आणि त्यात 625एल बूट स्पेस आहे. पाच-सीटर रचनेतील या विभागातील ही सर्वात जास्त बूट क्षमता आहे. सर्वोत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह रेनो ट्रायबरची निर्मिती करण्यात आली असून यात दर्जेदार चार एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

रेनोने दक्षिण आफ्रिका आणि सार्क प्रदेशात ट्रायबरची निर्यात सुरू केली आहे आणि आफ्रिकेतील तसेच सार्क प्रदेशातील इतर भागात देखील ट्रायबरची निर्यात वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. रेनो ट्रायबर माय 21 ही  https://renault.co.in  या संकेतस्थळावरून, माय रेनो ॲपवरून ऑनलाईन किंवा रेनोच्या अधिकृत वितरकाकडून नाममात्र 11,000 रुपये भरून बुक करता येणार आहे.

संपूर्ण नवी रेनो ट्रायबर माय 21 ही चार प्रकारात उपलब्ध असणार आहे – आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेड आणि यात एमटी आणि इझी-आर एएमटी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांच्या आवश्यकता आणि या विभागातील गरजा लक्षात घेऊनच प्रत्येक प्रकारची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक प्रकाराची किंमत ही आकर्षक ठेवण्यात आली आहे.

रेनो ट्रायबर माय21 ही पाच आकर्षक रंगात उपलब्ध असेल. मेटल मस्टर्ड, इलेक्ट्रिक ब्ल्यू, मूनलाईट सिल्व्हर, आईस कूल व्हाईट आणि सीडर ब्राऊन. आरएक्सझेड प्रकारात संपूर्ण गाडीच्या रंगामध्ये ड्युअल टोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.