Pimpri : महाराष्ट्रातील ८० बसस्थानकांचे नूतनीकरण करणार – दिवाकर रावते

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने नूतनीकरण विश्रांतीगृहाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – राज्यात एसटी बसस्थानकांत विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक अशा सोयीसुविधा असलेले स्वच्छतागृहे लवकर बांधण्यात येणार आहे. राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. बसस्थानकांची अवस्था चांगली नसल्यामुळे प्रवाशी, वाहक, चालक यांची गैरसोय होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. राज्यात लवकरच साजेशी एसटी महामंडळ उभारली जाणार आहेत. महाराष्ट्रातील ८० बसस्थानकांचे नूतनीकरण लवकरच होतय, असे मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.

पिंपरीतील वल्लभनगर आगार याठिकाणी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने नूतनीकरण विश्रांतीगृहाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर ३१३१चे डॉ. शैलेश पालेकर, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, सचिव महादेव शेंडकर, अनिल नेवाळे, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, वल्लभनगर आगारप्रमुख एस. एन. भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी रावते म्हणाले, नव्याने बांधण्यात येणा-या काही बसस्थानकांवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून छोटी चित्रपटगृहे देखील बांधण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रात विश्रामगृहे २५० असून ८० बसस्थानकाचे नूतनीकरण येत्या वर्षभरात केले जाणार आहे. पुढील पाच ते सात वर्षात एसटीचे रुप बदलणार आहे.

यावेळी बसस्थानकप्रमुख आगारांना यावेळी दिवाकर रावते यांनी सूचना दिल्या. महिलांसाठी आरसा असलेले कपाट बसवावे, लॉकर सिस्टिम असावी, मोबाईल चार्जिंगची सोय ठिकठिकाणी असावी. वाहक, चालक यांची विश्रांतीगृह सुसज्ज असावी. जेणेकरुन एखाद्या वाहकांमध्ये उद्याचा लेखक, कवी दडला असेल तर त्याला लेखन करण्यासाठी प्रशस्त वाटले पाहिजे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीचे वारे वाहत आहेत. याबाबत युती होणार की नाही हे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विचारल असता ते म्हणाले, युतीचा निर्णय शिवसेनेत चर्चा करण्याची पध्दत नाही, आदेश आला की तो पाळायचा असतो. तोडा म्हटला की तोडायचा असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.