Bejan Daruwalla Passed Away: नामवंत ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन, कोरोनावर घेत होते उपचार

Renowned astrologer Bejan Daruwalla passed away

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिषी बेजान दारुवाला (वय 90) यांचे अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. करोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्वीट करुन या संदर्भातील माहिती दिली. एक आठवड्यापूर्वी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी घेतली असता ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

बेजान दारुवाला हे नामवंत ज्योतिषी होते. ज्योतिष क्षेत्रात त्यांचे खूप मोठे काम होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1931 ला झाला होता. पारशी समाजाचे असूनही ते गणपतीचे निस्सीम भक्त होते. पारंपरिक ज्योतिष, पाश्चिमात्य ज्योतिष, टॅरो कार्ड, अंकशास्त्र, हस्तरेखा शास्त्र या विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. अनेक वृत्तपत्रं, टीव्ही चॅनेल्स यांवर ते भविष्य सांगत.

भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या समस्या निवारणासाठी मार्गदर्शऩ घेण्यासाठी जगभरातून अनेक मान्यवर त्यांच्याकडे येत असत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.