Chinchwad: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुरुवारी सन्मान

नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची माहिती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्य, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आज (मंगळवारी) येथे दिली.

चिंचवडमधील प्रा रामकृष्ण मोरे सभागृहात गुरुवारी (दि.12) संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

शरद पवार देशातील राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त या मान्यवरांच्या सन्मान केला जाणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक मधु जोशी, शास्त्रीय संगीत विशारद जयश्री लेले, ऑलिम्पिकवीर पैलवान मारुती आडकर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव सहस्रबुद्धे, ज्येष्ठ क्रिकेटपटू मिलिंद गुंजाळ, ज्येष्ठ लोककला कलावंत, प्रबोधनकार शारदा मुंडे, संगीत विशारद विद्याधर शिधये, प्रसिद्ध लोककलावंत संजीवनी मुळे- नगरकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत जंगलराव भोईर, ज्येष्ठ भरतनाट्यम विशारद (कथक) गीता शर्मा आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी मुख्य विश्वस्त श्री विघ्नहरी देव महाराज या सर्व मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच त्यानंतर झी कॉमेडी अवार्ड विजेते “यंदा कदाचित रिटर्न” या मराठी नाटकाचा प्रयोग सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर होणार आहे, असेही भोईर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.