Pune News : हातगाडी आणि बैठे परवानाधारकांना जुन्या नियमाप्रमाणे भाडे शुल्क

एमपीसी न्यूज – महापालिकेचे परवाना असणारे बैठे व्यावसायिक आणि स्थिर हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या नियमाप्रमाणे भाडे शुल्क आकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, पुणे महापालिकेचे नव्याने दरभाडे अंमलात आले आहे. परंतु सद्यस्थितीत या व्यावसायिकांच्या उत्पनापेक्षा आकारण्यात आलेले दरभाडे शुल्क अधिक आहे. त्यामुळे जुन्या नियमाप्रमाणे भाडे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.