Repo Rate : रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ; गृहकर्ज आणि कार लोन महागणार!

एमपीसी न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी (Repo Rate) रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. केंद्रीय बँकेने रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. रेपो दर 6.25% वरून 6.50% करण्यात आला आहे. याआधी आरबीआयच्या एमपीसीची महत्त्वाची बैठक तीन दिवस चालली. यानंतर या बैठकीची माहिती आणि या काळात घेतलेल्या निर्णयांची माहिती घेण्यासाठी शक्तीकांत दास यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

RBI च्या निर्णयामुळे गृहकर्ज EMI वाढणार आहे – 

मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जाचा ईएमआय वाढणार आहे. रेपो रेट वाढल्यानंतर गृहकर्ज EMI तसेच कार लोन आणि वैयक्तिक कर्जही महाग होणार आहे. मे 2022 मध्ये रेपो 4% होता, जो आता 6.5% झाला आहे.


गव्हर्नर म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत जागतिक परिस्थितीमुळे जगभरातील बँकांना व्याजदर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. महागाई नियंत्रणासाठी हे कठोर निर्णय आवश्यक होते.


जागतिक आर्थिक दृष्टीकोन काही महिन्यांपूर्वी होता तितका गंभीर (Repo Rate) नाही, प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वाढीची शक्यता सुधारली आहे, तर महागाई कमी झाली आहे. तथापि, प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा जास्त आहे.


महागाईवर बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, आर्थिक वर्ष 23 मध्ये महागाई दर 6.7 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर येऊ शकतो. FY24 मध्ये वास्तविक GDP वाढ 6.4 टक्के असू शकते. FY24 च्या पहिल्या तिमाहीत GDP 7.1 टक्क्यांवरून 7.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे.


यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत व्याजदर 5.90% वरून 6.25% करण्यात आले होते. RBI ने गेल्या वर्षीपासून सहा वेळा रेपो दरात वाढ केली आहे, एकूण 2.50% ने वाढ केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.