Bhosari : अवैध धंद्यांबाबत पोलिसांना कळवा, एमआयडीसी भोसरी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सुरू करण्यात आली आहे. शहराला अवैध धंदेमुक्त करण्यासाठी पोलीस नागरिकांच्या देखील सहभागाची अपेक्षा करीत आहेत. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मोहीम उघडली आहे. सर्व पोलीस निरीक्षकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून देखील अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एमआयडीसी भोसरी परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 7378563100 या क्रमांकावर नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहराला अवैध धंदेमुक्त करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
एमआयडीसी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी म्हणाले, “एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती, विक्री, मटका, जुगार, वेश्याव्यवसाय असे अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.