Pune : पथदिव्यांच्या तक्रारी नोंदवा आता मोबाईल अॅपवर

एमपीसी न्यूज – महानगरपालिका हद्दीतील पथदिवे बंद असणे, पथ दिव्यांचे शॉर्ट सर्किट होणे, पथदिवे जोडणीवरुन शॉक बसणे अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांना मोबईल अॅपद्वारे करता येणार आहे.

या तक्रारीसाठी पालिकेने अॅपची निर्मिती केली आहे.  या बरोबर टोल फ्री क्रमांक- १८००८३३८८११ देखील सुरु करण्यात आले आहे.  हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. यावर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कंदुल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.