Republic Day 2021 : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 2021च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे

एमपीसी न्यूज – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 2021 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. राब म्हणाले, “आमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.”

पंतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.

भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांमधील एका नव्या युगाचं प्रतीक असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.