Pimpri News : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बालचमू रमले रंगांच्या दुनियेत

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनानिमित्त अभ्युदय को. ऑपरेटिव्ह बँक, पिंपरी शाखेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. भोसरी येथील गंधर्व नगरी सोसायटी, (Pimpri News) फेज 2 येथे या स्पर्धा घेण्यात आल्या . 3 ते 5 वर्षे आणि 5 ते 8 वर्षे वयोगटातील 90 हून अधिक बालचमू स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर मुलांना खाऊवाटप करण्यात आले.

Asaram Bapu Convicted : आसाराम बापूंना अखेर जन्मठेपेच!

उपसरव्यवस्थापक गणेश मंचरकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजू सौंदलगेकर आणि पिंपरी शाखेतील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंचरकर, (Pimpri News) सौंदलगेकर, सोसायटीचे अध्यक्ष भूषण पाचारणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बांगर यांनी केले.

स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे
गट 1 ( 3 ते 5 वर्षे)
प्रथम – शास्त्रा खुळे
द्वितीय – अर्णव रायकर
तृतीय – अन्वी सचिन कांबळे
गट 2 (5 ते 8 वर्षे)
प्रथम – शर्वरी भाजीपाले

द्वितीय – कुमार बोबडे
तृतीय – स्नेहल पाटील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.