Republic day 2023 : महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा अवतरणार ‘साडेतीन शक्तिपीठे’; होणार स्त्रीशक्तीचा जागर

एमपीसी न्यूज : राजधानी दिल्लीत राजपथावर उद्या प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठ (Republic day 2023) आणि नारी शक्ती या विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे. शिवाय देवीसमोर गोंधळ करणारे गोंधळी ज्यामध्ये पोतराज, हलगीवाला, जोगवा मागणारे आणि इतर दहा शिल्प चित्ररथामध्ये दिसणार आहेत.

बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत राहणार आहे. विशिष्ट फायबरपासून ही शिल्प तयार करण्यात आली आहेत. अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या (Republic day 2023) अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी दिली आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. 30 जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तीकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम केले आहे.

Maval News : भरधाव दुचाकी चालवणे 16 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले

26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचं दर्शन घडवणारी 13 राज्यांची, (Republic day 2023) चार केंद्रशासित प्रदेशांची आणि सहा विविध मंत्रालयांचे असे एकूण 23 चित्ररथ दिसतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.