Pimpri News : किवळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

एमपीसी न्यूज –  74 वा प्रजासत्ताक दिन गुरुवारी (दि.26) उत्साहात साजरा (Pimpri News ) करण्यात आला. जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, किवळे येथील लहान मुलांनी प्रजासत्ताक दिनाचे पूर्ण नियोजन करत मंडळातील सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला वर्ग यांना एकत्रित करून हा दिन साजरा करण्यात आला.

Pune News : प्रजासत्ताक दिनानिमित्त आप तर्फे पुण्यात तिरंगा रॅली

यावेळी लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र तरस व ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण परिसर आकर्षक सजावट करून सजविण्यात आला होता. मुलांनी स्वतःच्या हातांनी तिरंगी कागदी माळा व फुले बनविली होती. आपल्या साठवलेल्या पॉकेट मनीतून ही सजावट केली होती.लहान मुलांनी केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन पाहता सर्वच भारावून गेले होते. सर्वांनी या मुलांचे कौतुक केले. त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर  झळकत होता. या नियोजनात मुलांचा उत्साह शेवटपर्यंत कायम होता.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकऱ्यांसह, सदस्य, महिला व ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का जाधव तर आभारप्रदर्शन खुशी देवाडिगा(Pimpri News ) हिने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.