Republic Day Parade: दिल्लीच्या राजपथावर शानदार संचलनात झळकली महाराष्ट्राची ‘संत परंपरा’

एमपीसी न्यूज – भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत राजपथावर दिमाखदार पथ संचलन झाले. या मुख्य संचलन समारंभात संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय बनला. 

देश आज 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करीत आहे. मुख्य सोहळा दिल्लीतील राजपथ येथे झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पथसंचलन सोहळा सुरू झाला. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडिया गेटजवळील युद्ध स्मारकात गेले होते. स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे युद्ध स्मारक बांधले गेले आहे.

संचलन समारंभात संत परंपरेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय बनला. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या या आकर्षक चित्ररथामध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी अशी प्रतिकृती साकारली होती. पांडुरंगाची मूर्ती व त्यापुढे संतांचा मेळा, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भेटीवर आधारित प्रसंग चित्ररथाची शोभा वाढवत होत्या.

पथ संचलनात केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘नव भारत’ या संकल्पनेवर चित्ररथ साकारला होता. 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.