Maharashtra Bandh : रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे वाहने अंगावर घालून शेतक-यांना चिरडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चा देखील सहभागी होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केले.

शिवशंकर उबाळे, भारत मिरपगारे, ज्ञानेश्वर बोराटे, अमोल डंबाळे, मेघा आठवले, गंगा चलवादी, बाळासाहेब जाधव, राम ठोके आदी याप्रसंगी उपस्थित होते.

लखीमपूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. न्याय मागण्यासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांना चिरडले आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व औद्योगिक कारखाने, व्यापारी, संघटनांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.