Akurdy : भूसंपादित जमिनीच्या परताव्याविषयी निवेदन 

एमपीसी न्यूज  –  भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना साडेबारा टक्के जमीन परताव्यासंबंधी निवेदन देण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सन 1972 ते 1984 या कालावधीत भूसंपादन केले होते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राधिकरणाकडे विविध प्रकल्प राबवून शिल्लक असलेली अतिरिक्त जमीन, अव्यवहार्य आणि रद्द झालेल्या प्रकल्पांमुळे पडून असलेल्या जमिनींवर झालेले अतिक्रमण यांची तपशीलवार माहिती घेऊन त्यासंबंधी विस्तृत निवेदन तयार करण्यात आले.

निगडी-आकुर्डी-वाल्हेकरवाडी या गावांतील भूसंपादन बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कैलास कुटे, श्रीधर वाल्हेकर, शंकरराव पांढारकर, तानाजी काळभोर, दीपक काळभोर, राजेंद्र काळभोर, अनंत काळभोर, संतोष काळभोर, संतोष तरटे, विनायक वायकर, बाबासाहेब वाल्हेकर, प्रशांत थरकुटे, संभाजी काळभोर, ऍड.राजेंद्र काळभोर या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुपूर्द करीत साडेबारा टक्के जमीन परतावा वाटपाबाबत सुधारित शासन निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.