BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : अंतरंग दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – दिवाळी अंकांच्या जत्रेमध्ये आपले वेगळे असे अस्तित्त्व राखत आठव्या वर्षात पदार्पण करणा-या पिंपरी-चिंचवड ‘अंतरंग’ या दिवाळी अंकासाठी अगोदर कोठेही प्रसिद्ध न झालेले साहित्य पाठवावे. यामध्ये स्वलिखित कथा, वैचारिक, आधुनिक लेख, प्रवासवर्णने, व्यंगचित्रे, कविता या प्रकारचे साहित्य पाठवू शकता.

इच्छुकांनी आपल्या साहित्याची टाईप केलेली प्रत 30 सप्टेंबरपर्यंत आमच्या [email protected] या ई-मेलवर पाठवावी. त्यावर ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग दिवाळी अंकासाठी’ असा उल्लेख करावा. अथवा पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामागे असलेल्या भक्ती कॉम्प्लेक्स मधील ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन दिले तरी चालतील. निवडक साहित्याला योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल.

अधिक माहितीसाठी स्मिता जोशी यांच्याशी 9011050004 या क्रमांकावर संपर्क साधावा.

HB_POST_END_FTR-A2

.