_MPC_DIR_MPU_III

Pune : सरड्यांवर संशोधन आवश्यक –  गौरांग गोवंडे

एमपीसी न्यूज – सरड्यांच्या भारतामध्ये शंभर पेक्षा अधिक जाती आहेत. त्यातील बऱ्याच जाती फक्त भारतात आढळतात. जगात सरड्याच्या ३०० पेक्षा अधिक जाती आहेत. सरडा हा गिरगिटपेक्षा निराळा गट आहे. ते गिरगिट प्रमाणे रंग बदलू शकत नाहीत. तरी प्रजनन हंगाममध्ये नर हे भडक रंगाचे होतात. सर्वाधिक आकर्षक, रंगीत वा भडक नर प्रजननासाठी मादी निवडते.

सरडा हा जैवविविधताप्रणाली मधील महत्त्वाचा घटक आहे. तो कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. भारतामध्ये २०१० नंतर सरड्यावरील संशोधनाला चालना मिळाली. तरी एकूण भारतामध्ये किती जाती आहेत व त्या कशा प्रकारे वितरित आहेत याच्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. ते समजल्यावर सरड्यांचे अजून चांगल्या पद्धतीने संवर्धन करता येईल, अशी माहिती संशोधक गौरांग गोवंडे यांनी दिली.

भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व, सरड्यांची शरीररचना, त्यांचे आहार याबद्दल पुणेकरांनी अनुभव घेतला. ‘वनराई’च्या वतीने गौरांग गोवंडे यांचे ‘सरडा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सरड्याविषयी सखोल माहिती या व्याख्यानात देण्यात आली. सरड्यांवर सध्या सुरु असलेल्या अभ्यासाबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. सरड्यांच्या जातींना सध्या काय धोके आहेत त त्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याबद्दलदेखील या कार्यक्रमात चर्चा झाली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी वनराईचे प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर,कार्यकारी संपादक अमित वाडेकर, भारत साबळे उपस्थित होते. वनराई संस्थेच्या वतीने दर महिन्यातील पहिल्या शनिवारी विविध विषयांवरील संशोधकांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले व्याख्यान या महिन्यात ‘सरडा’ या विषयावर झाले. तर पुढच्या महिन्यात ‘गवत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

गोवंडे म्हणाले, सरडा प्रामुख्याने कीटकभक्षीअसून तो उपद्रवी व विषारी नाही. बहुसंख्य सरडे कीटकभक्षी आहेत, फक्त एक जात शाकाहारी आहे. गिरगिट प्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना जीभ बरीच लांब बाहेर काढता येत नाही. सध्याचा कोणताही सरडा खराखुरा जलचर नाही व उडणाराही नाही परंतु सर्व प्रकारच्या पर्यावरणांत राहण्यासाठी व जीवन जगण्यासाठी त्यांचे अनुकूलन झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आकार, आकारमान व संरचना या बाबतीत अनुरूप अशी खूपच विविधता दिसते.

गौरांग गोवंडे हे भारतातील पाली आणि सरडे यांवर संशोधन करत आहेत. त्यांनी आपल्या संशोधनातून पालीच्या दोन आणि सापांच्या एका नव्या जातीचा शोध लावला आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. जागतिक तापमानवाढीचे सरडयांच्या लोकसंख्येवर आणि त्यांच्या अधिवासावर होणारे परिणाम याबाबत सध्या ते अभ्यास करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1