Pune News : कोरोनासाठी बेड्स राखून ठेवा, पुणे मनपाचे 84 खासगी हॉस्पिटलला आदेश

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरातील कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेकडून तयारी सुरू झाली आहे. तब्बल 84 खासगी हॉस्पिटलला कोरोनासाठी 50 टक्के बेड्स राखून ठेवण्याचे निर्देश पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. 

या संदर्भात आरोग्य विभागाकडून संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला ई मेल पाठविण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात ज्या 84 खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी राखून ठेवलेल्या एकूण बेड्स पैकी 50 टक्के बेड राखून ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पुर्वीच्या माहितीचे अद्ययावतीकरण केले जात आहे. डॅश बोर्ड पुन्हा अॅक्टिव्ह केला जाणार आहे.

त्यासाठी सरकारी रुग्णालये, महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये किती बेड्स आहेत, ऑक्सिजन बेड किती, व्हेंटिलेटर किती आहेत यांची महिती संबंधित रुग्णालयांकडून मागविण्यात आली आहे. कोविड केयर सेंटरमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत याचाही आढावा घेतला जात असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.