Uddhav Thackeray Shivsena: पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एमपीसी न्यूज : आज पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह 36 युवती पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारणामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे.

पक्षाविषयीची निष्ठा अजूनही कायम असल्याचे सांगत आम्ही पक्षाचे कार्यकर्ती म्हणून काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे, एकाच वेळी 36 पदाधिकाऱ्यांनी युवती सेनेकडून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Kartiki Ekadashi: अहमदनगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ चौधरी ,सविता चौधरी यांना आळंदी कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान

या राजीनाम्याबाबत शर्मिला येवले म्हणाल्या की, मागील दोन वर्षांपासून शिवसेनेच्या युवती राज्यभरात अनेक आंदोलन, निवडणुकांमध्ये काम करीत आहे.मात्र प्रत्येक वेळी युवती सेनेमधील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक दिली गेली नाही. आंदोलन घेतले तर प्रसार माध्यमांना का प्रतिक्रिया दिली, प्रसार माध्यमांशी संवाद साधू नका असे अनेक वेळा सांगण्यात आले. आपला पक्ष,आपली काम याच माध्यमामधून नागरिकांपर्यत पोहोचू शकतो, असे मला वाटते.

ही बाब वरिष्ठांना सांगून देखील सतत आम्हाला कोणतीही भूमिका मांडू दिली गेली.त्यामुळे आम्ही अखेर सर्व ३६ युवती पदाधिकारी राजीनामे देत आहोत. मात्र, आम्ही कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार आहे. आम्ही कोणत्याही इतर पक्षात जाणार नाही. या सर्व घडामोडी घडत असताना आमच्या कामाच आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी कौतुक देखील केले. पण पक्षातील वरीष्ठ मंडळीकडून चूकीची वागणूक देत असल्याने आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.