Pune : 2020 मध्ये शहरातील अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिका पदाधिकाऱ्यांचा संकल्प

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच घेतला आहे.

‘एचसीएमटीआर’, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा – आसखेड, नदी सुधार – जायका प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, पथ विभागाकडील महत्वाचे रस्ते, प्रस्तावित बोगदे, बालभारती पौड फाटा रस्ता, मयूर डीपी रस्ता, शिवसृष्टी, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, स्मार्ट सिटीचे प्रकल्प, पुणे मेट्रो, ‘पीएमपीएमएल’ बस खरेदी व सेवा सुधारणा, स्व. अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, महापालिकेचे इतर दवाखाने व हॉस्पिटलमधील सेवा सुविधा, शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल, उद्यानांमधील सुधारणा, ‘सीएसआर’ निधीमधून करावयाची कामे, ‘बीओटी’ माध्यमातून करता येऊ शकणारे प्रकल्प, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेची गतिमानता वाढविणे, शिक्षण विभाग संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी सभागृह नेते धीरज घाटे आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी संकल्प केला आहे.

तर, महापालिकेचे उत्पन्न 10 हजार कोटींपर्यंत नेण्यासाठी आपण सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.