Shivrajyabhishek : शिवरायांचे विचार तरुणाईत रुजण्यासाठी शिवराज्याभिषेक करण्याचा संकल्प – रामदास काकडे

मावळ तालुक्यात एकाच वेळी 127 ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा

एमपीसी न्यूज – शिवरायांचे विचार तरुणाईत रुजण्यासाठी शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek) साजरा करण्याचा संकल्प इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास (आप्पा) काकडे यांनी केला. काकडे यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराजांचा 348 वा शिवराज्याभिषेक दिन मावळ तालुक्यात एकाच वेळी 127 ठिकाणी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि अन्य कार्यक्रमांमधून हा सोहळा साजरा झाला.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास (आप्पा) काकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ तालुक्यात तब्बल 127 ठिकाणी 348 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तालुक्यात शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, अभिषेक असे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शिवप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला.

Narendra Pendse : हिंदू समाज संभ्रमावस्थेत

शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिनानिमित्त मावळ तालुक्यातील गावोगावी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला, तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, भजन, ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, व्याख्याने अशा विविध प्रकारे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला गावांमध्ये रामदास (आप्पा) काकडे यांच्यातर्फे शिवप्रतिमा, मिठाई, शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी आवाहनात्मक पत्रक देण्यात आले होते.
रामदास (आप्पा) काकडे म्हणाले, की छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की एक वेगळीच स्फूर्ती मिळते उत्साह निर्माण होतो. यंदापासून दरवर्षी तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामस्थांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा संकल्प  करण्यात आला आहे. तरुणाईमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजावेत, हा या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.