Vadgaon Maval : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त मावळ तालुक्यात ५०० वृक्षारोपणाचा संकल्प

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या आवाहनाने  मावळ ओबीसी सेल व वडगाव शहर यांच्या वतीने गुरुवारी  सकाळी ११:३० वा. येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मावळ तालुक्यात ५०० वृक्षांच्या रोपांचे रोपण करुन संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,  कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, ज्येष्ठ नेते अशोक बाफना, नारायण ठाकर,  सुभाष जाधव, युवक कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधवर, राजेश बाफना, विशाल वहिले, आफताब सय्यद, शैलेश वहिले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन अतुल राऊत, मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, मयुर गुरव, बंटी वाघवले, विकास चौधरी, नितिन धोंगडे, गणेश बरदाडे, विनय लवांगरे, सनी बेल्हेकर, आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.