BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी संभाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा संकल्प करा – भिडे गुरूजी

जंगली महाराज मंदिरात धारक-यांशी साधला संवाद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असा उपदेश संभाजी भिडे गुरुजींनी धारकर-यांना केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदू व्रत घेऊन जगले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जगणारा समाज शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठया संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात एकत्रित आले होते. त्यापूर्वी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थित धारक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी भगवे फेटे परिधान करून धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘शिवप्रतिष्ठानच्या वतीने रायगडावर 32 मन सोन्याचे सिंहासन साकारण्यात येणार आहे. यावेळी  राज्याच्या कानाकोपऱ्यातील तीन हजार धारक-यांच्या तुकड्यांनी जुलै महिन्यात किल्ले रायगडावर एकत्र यावे’, असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअप या फेकू माध्यमांकडे ढुंकून देखील बघू नका असही सांगितलं.

HB_POST_END_FTR-A1
.