Pune News : रिसॉर्ट बुक करायला गेला आणि गमावले एक लाख रुपये

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध रिसॉर्ट चे बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन पैसे भरणे पुण्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.(Pune News) रिसॉर्ट बुक करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला एक लाख रुपये गमवावे लागले आहेत. प्रकरणी रोहिदास मोरे (74) यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांनी सप्टेंबर महिन्यात “द किज एवरशाईन रिसॉर्ट” या महाबळेश्वर मध्ये असलेल्या नामांकित हॉटेलच्या बुकिंगसाठी ऑनलाईन मार्ग निवडला होता. यासाठी त्यांनी एका वेबसाईटशी संपर्क साधला असता त्यांना मोबाईल क्रमांक 8837360783 वरुन तुमचे बुकिंग केले जाईल असे सांगण्यात आले. या मोबाईल नंबर वरुन मोरे यांना संपर्क देखील झाला आणि डिसेंबर मध्ये हवं असलेल्या रिसॉर्ट च्या बुकिंग साठी advance पेमेंट करा असे सांगितले.

Alandi News : आळंदीत हिंदूहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन

या मोबाईल धारकाने मोरे यांचा विश्वास संपादन करून व्हॉट्सॲप वर कुठल्या बँकेत पैसे पाठवायचे सांगितले. वेबसाईट वरून नंबर मिळाला हा विशवस बाळगत मोरे यांनी या मोबाईल नंबर वर 1 लाख रुपये पाठवले. मात्र त्यानंतर त्यांना कुठलाच परत फोन आला नाही इतकचं काय मोरे यांनी (Pune News) महाबळेश्वर मध्ये जाऊन विचारले असता असे कुठले ही बुकिंग नसून तो मोबाईल नंबर देखील आमचा नाही असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता मोरे यांनी पोलिसात धाव घेतली

पोलिसांच्या तपासादरम्यान हा मोबाईल नंबर उत्तर प्रदेशातील आहे असे आढळून आले. या अज्ञात मोबाईल धारकावर  फसवणुकीचा गुन्हा अलंकार पोलिस ठाण्यात दाखल असून. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.